मी माझे आवरून नेहमीप्रमाणे ऑफिस ला जायला निघाले ,आज बऱ्याच दिवसांनी आकाशात काळे ढग दाटून आले होते.. ते काळे ढग पावसाळा जवळ आल्याची जणू आठवणच करून देत होते .मग माझ्या लक्षात आले कि अरे आज तर ७ जून ...म्हणजे पावसाची हजेरी हि नक्की .. आणि तिथूनच मनामध्ये विचारांची कालवाकालव सुरु झाली ... एकामागून एक पुस्तकाची पाने जशी उलटून पहिल्या पानावर जावी तशी..
अजून शाळेचा पहिला दिवस आठवतो.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या कि जून च्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु व्हायची . आणि त्याबरोबर मान्सून चे पण आगमन व्हायचे . शाळा सुरु होण्याआधी बाबा आम्हाला गावात घेऊन जायचे. नवीन युनिफॉर्म .. नवीन दप्तर ... रेनकोट.. वह्या पुस्तक आणायला ... तेव्हा नवीन दप्तर आणि नवीन रेनकोट ची मजा च वेगळी असायची.. वह्या पुस्तकांमधून येणार सुगंध तर मन मोहून टाकायचा .. आणि कधी एकदा त्या करकरीत वह्यांवर नवीन पेनाने नाव टाकते असे व्हायचे .. त्याकाळी शाई च्या पेन ची फॅशन होती.. आमच्या शिक्षिका तर शाईच्या पेनाचाच आग्रह धरायच्या.. त्यांच्या मते शाईच्या पेनाने ने अक्षर सुधारते .. माझे अक्षर तर प्रत्येक वर्षी बदलायचे.. मग तो कोणताही पेन का असेना..
पावसातून घरी भिजून आले कि आईबरोबर वाफाळलेला चहा घेत गप्पा मारण्यात स्वर्गप्राप्ती झाल्याचा आनंद मिळे..चहाबरोबर कधी कधी तिखट मिठाचे पोहे तर कधी पातळ पोह्याचा चिवडा.. आणि बाबांच्या मनात आली कि गरमा गरम कांदा भजी हे ठरलेले.. ओले केस घेऊन खिडकीतून त्या पावसाच्या सरीकडे एकसारखे बघत राहायचे.. आणि साथी ला आकाशवाणी वर किशोर कुमार, महम्मद रफी यांची गाणी ऐकायची ....
रात्र झाली कि पावसाचा जोर आणखीनच वाढायचा.. जोराचे वादळ.. विजांचा कडकडाट.. ढगांचा गडगडाट .. आणि त्यात MSEB च्या कृपेने लाईट्स जायचे..आणि सगळीकडे काळोख व्हायचा . मग बाबा मला आणि माझ्या भावाला घेऊन बालकनीमध्ये बसायचे.. मग आम्ही गावांच्या भेंड्या खेळायचो..आणि सगळ्या गावांची नावे घेऊन संपली कि मग बाबा आम्हाला भूत- प्रेतांच्या गोष्टी सांगायचे .... लाईट्स येईपर्यंत आमचे हेच चालायचे..
किती बेफिकीर राहायचो तेव्हा आम्ही !!!!.एवढ्या लहान वयात सुद्धा!! भीतीचा थोडा देखील लवलेश नव्हता..मग ते भूत असो कि जोरदार पाऊस.. कि काळोख .. आई बाबांच्या छत्रा खाली सगळेच आल्हाददायी वाटायचे ..या आठवणीने टचकन डोळ्यात पाणी आले .. आणि ते पाणी टिपेपर्यंत ऑफिस पर्यंत कसे पोहचले ते कळलेच नाही..
Good Start Snehal.. Keep it up..!! Waiting for your next blog.. :)
ReplyDeletenice article very genuine keep it up !
ReplyDeleteVery touching!
ReplyDeleteचांगली आहे शिदोरी
ReplyDeleteWow! Bhari lihle ahes Snehal...
ReplyDeleteI am in love with you girl, I didn't know you write.Spent my lunch break today going through your website and loved all your articles:)
ReplyDelete