११ ची वेळ झाली होती.. आमच्या कॉफी ब्रेक ची वेळ.. आम्ही हि
वेळ कधीच चुकवत नाही. मग कितीही कामं असूदेत.. कारण रोजच्या कामाच्या गडबडीत, हिच वेळ
आम्हाला रखरखीत उन्हातल्या मंद वाऱ्याच्या झुळुकेप्रमाणे वाटते. आमची कॉफी बरोबर, क्रिकेट वर चर्चा चालू होती.. नुकतीच
भारताने श्रीलंके विरुद्ध मॅच हारली होती ..कोण कसे खेळले.. कोणी कश्या चुका
केल्या.. इंडियन प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केलेल्या गोलंदाजांनी देखील कशी माती खाल्ली यांवर.. असाच संवाद सुरु असताना , एकजण मधेच म्हणाला , कि मी थोड्या वर्षांनी हि नोकरी सोडून गोट्या लीग काढणार!! जसे क्रिकेट, फुटबॉल,कब्बडी यांचे आहे ना तसे.. आम्हाला थोड्यावेळ कळलेच
नाही कि तो काय म्हणत आहे ते .. नंतर कळल्यावर मात्र हसू आवरता आले नाही .
गोट्या लीग म्हणे!!!
या काळात कसल्या आल्यात गोट्या .. गोट्या, विटी दांडू, लगोरी यासारखे
खेळ आता नामशेष होत चालले आहेत.. आता मुलांना हातात मोबाईल हवा.. मग तो गावात
राहणार असुदेत कि शहरात राहणारा.. आणि विशेष म्हणजे नुसते मोबाईल असून
चालत नाही तर इंटरनेट पण हवे.. ऐकून आश्चर्य वाटले ना? मला पण असेच झाले
होते.. मी माझ्या बहिणीच्या घरी राहायला गेले होते. तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे
. ती काही केल्या जेवायला तयार होत नव्हती. मग माझी ताई तिला जरा दरडावतच
म्हणाली "जेव चुपचाप नाहीतर wi-fi बंद करेन" हे ऐकल्यानंतर मात्र तिने क्षणाचाही विलंब न लावता जेवायला सुरवात केली..
मी तर अचंबित होऊन बघतच राहिले!!
wi-fi बंद करण्याची
धमकी!!! आमच्या वेळी तर, पोलीस मामांना बोलावेन, बाबा रागावतील..
अश्या स्वरूपात धमकया असायच्या. आता मोबाईल, इंटरनेट, संगणक यांच्यासमोर कशाशीच बिशाद चालत नाही. मग असे वाटते कि
या गोष्टी तर माणसाने स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केल्या आहेत .. तर याच्या
आहारी जाणे कितपत योग्य आहे? आणि
लहानपणापासूनच जर मुलं मोबाईल मध्ये एवढी गुरफटून गेली तर त्यांना बाहेरची
दुनियादारी कधी आणि कशी कळणार? अशीच
मुलं मग चार चौघांमध्ये जायला घाबरतात आणि कावरी बावरी होताना दिसतात. आता मुलांना असेच एक्कलकोंडे बनवायचे कि गरुडाच्या
पिल्लासारखे धीट बनवायचे ते तुम्हीच ठरवा!!!
GOOD...VERY NICE......
ReplyDeleteVery nice Snehal.....
ReplyDeleteहाहाहा. गोट्या लीग! मी घेणार त्यात भाग.
ReplyDelete