चहा
करणं म्हणजे वाटतं तेवढं सोप्पं नाही बरं का !! जरी त्याला बनवण्यासाठी लागणारे
जिन्नस तेच असतील पण तुम्ही कोणत्या प्रमाणात किती जिन्नस टाकता आणि कितीवेळ उकळवता
यावर ते आवलंबून असते . आणि ते देखील प्रत्येक माणसाच्या आवडीनुसार बदलत असतं . कोणाला दूध कमी तर कोणाला साय असल्याशिवाय
चहा नाही चालत . कोणाला फिक्का चहा तर कोणाला बासुंदीसारखा गोड! कोणाला आलं असलेला
तर कोणाला वेलदोडा घातलेला. पण यामुळे घरच्या स्त्रीची किती तारंबळ उडते याचा मात्र कोणी विचार करत नाही . मला चहा वर लिहायची
वेळ यासाठी आली कि आज फक्त माझ्या एकटीच चहा बनवायचा होता पण मला समजत च नव्हतं कि कोणत्या पद्धतीने बनवू कारण रोज
मी दुसऱ्यांच्या आवडीनुसार चहा बनवते
. तर कधी एकटीच्या आवडीचा प्रश्नच आला नाही .
पण त्यामुळे आज एक लक्षात आले कि लोकांच्या
मनाप्रमाणे चहा बनवता बनवता मला नेमका कश्याप्रकारचा चहा आवडतो हे मात्र मी विसररुन
गेले.