आज बऱ्याचवेळ आरशासमोर रेंगाळत होते.. आज सुट्टीचा दिवस!.. त्यामुळे वेळ च वेळ होता.. आरश्यात बघून मी आरामात आवरत होते आणि मनोमन स्वतःची स्तुती करत होते .. आज मी परत स्वतःच्या प्रेमात पडले होते .. बाह्यसौंदर्यामुळे नाही तर गेल्या ४-५ वर्षांमध्ये माझ्यात जो बदल झाला त्यामुळे.. आता मी बिनधास्त, कॉन्फिडन्ट आणि इंडिपेन्डन्ट आहे .. आणि आधी ज्या ज्या गोष्टी मला जमणार नाही असे वाटायचे त्या आता मी न घाबरता करू लागले आहे. . हा बदल झाला तो काही चांगल्या लोकांच्या संगतीमुळे, बेतलेल्या परिस्थितीमुळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी ठरवले म्हणून..
"मी" ऐकून वाटत असेल हि काय स्वतःचीच स्तुती करत आहे.. पण किती कमी वेळा करतो न हे आपण ?? स्वतःचे कौतुक !! नाहीतर बाकीच्यावेळेस.. ती किती सडपातळ आहे.. तो किती छान इंग्लिश बोलतो.. तिचा ड्रेसिंग सेन्स किती छान आहे.. वगैरे वगैरे.. अर्थात बाकीच्यांकडून शिकण्यासारखे बरेच असते.. पण सांगण्याचा उद्देश असा कि स्वतःला कधीही कमी लेखू नये.. आता अमिताभ बच्चन चे च बघा ना.. त्यांना रेडिओ मध्ये घेतले नाही का तर त्यांचा आवाज चांगला नव्हता.. आणि आता बघा! त्यांच्या आवाजासाठी लोक सिनेमागृहाबाहेर लाईन मध्ये तासोन्तास उभे असतात.. हे शक्य झाले ते त्यांच्या स्वतःवरच्या विश्वासामुळे.. आणि विश्वास कधी निर्माण होतो जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता आणि जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करता तेव्हा!
प्रत्येक मुलीला वाटते कि मी गोरीपान आणि सुंदर असावे.. प्रत्येक मुलाला वाटते कि माझी सलमान खान सारखी बॉडी असावी.. यात गैर काही नाही पण हा विचार करण्यापेक्षा अशी गोष्ट शोधा जी तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही सुंदर व्हाल.. जसे कि लता मंगेशकर त्यांच्या आवाजामुळे .. सचिन त्याच्या क्रिकेट मधील योगदानामुळे.. पण यासाठी स्वतःवर प्रेम करा .. आजच जाऊन आरशात बघा आणि तुम्हाला देखील तुमच्यातील ती गोष्ट सापडेल जिच्यामुळे तुम्ही सुंदर आहात !!!!