अति परिचयात अवज्ञा!!!!

अति परिचयात अवज्ञा  सन्तत गमनात अनादरः भवति !
 मलये भिल्ली पुरन्ध्री चन्दन तरुन  इन्धनम् कुरुते !

खरंच कोणत्याही गोष्टीला हि सीमा हवीच! वरील सुभाषित हे माझ्या आवडीपैकी एक,, याची मला   बऱ्याचदा प्रचिती आलेली  आहे ..  कोणत्याही व्यक्तीचा अति परिचय झाला कि त्या व्यक्तीचे तेवढे महत्व राहत नाही.. बघा ना.. ती भिल्ल स्त्री चंदनासारख्या किमती झाडाचे लाकूड रोज इंधनासाठी वापरते !! 

खरंच हे सगळ्या नात्यांसाठी लागू पडते.. ते नवरा बायको असूदेत.. कि दोन मित्र असूदेत.. नाहीतर कोणीही.. प्रत्येक नात्यामध्ये एक सीमा असते .. तिचे जर उल्लंघन झाले तर मग त्या व्यक्तीची कालांतराने चीड यायला लागते..  माझे ओळखीच्यातलेच उदाहरण बघा न.. माझा चांगला मित्र आदित्य ... तो खूप जास्त social  आहे.. त्याचे आहेत ढीगभर फ्रेंड्स.. आणि मग त्याचे कसे असते कि एकदा मित्र झाला कि मग त्याचे पर्सनल प्रॉब्लेम पण ह्याचेच !!! असेच त्याचा एक चांगला मित्र झाला रवी .. आणि तो पुण्यामध्ये याच्या सांगण्यावरून आला..  आदित्यने  त्याला  प्रत्येक कामामध्ये मदत केली..तो शहरात नवीन म्हणून  घरातली भांडी, सामान सगळं त्याला मदत म्हणून देऊ केले.. एवढ्यावर थांबले असते तर ठीक होते पण रवीचे  वैवाहिक जीवनातले प्रॉब्लेम्स वेगळे.. त्यात पण  तो आदित्यालाच  इन्व्हॉल्व्ह करू लागला.. आणि मग रोज नवीन प्रॉब्लेम्स . सुरवातीला हा माझा मित्र पण त्याला मदत करत असे ..पण  नंतर याचे स्वतःचे आयुष्य negative  झाल्यासारखे वाटू लागले.. आणि याला  रवीची  चीड येऊ लागली पण काही पर्याय नव्हता  !!  खर तर मित्र हे सुखदुःख वाटण्यासाठीच असतात पण याचा अर्थ असा नाही कि तुम्ही  दुसऱ्यांच्या   प्रॉब्लेम्स मध्ये एव्हढे इन्व्हॉल्व्ह होता कि दुसरी व्यक्ती तुमच्या वर परावलंबी होते आणि  नंतर त्याची बांडगुळ होतात.. आणि त्या बांडगुळाला नंतर दूर करणे पण शक्य होत नाही आणि पोसणे पण अवघड जाते.. 

मी म्हणते अशी परिस्थिती कधी आलीच नसती जर तुम्ही थोडी space  दिली असती एकमेकांना .. मी काय माणूस घाणी नाहीये किंवा एक्कल कोंडी नाहीये ..  पण healthy relation साठी थोडी sapce  हवीच .. बरेच लग्न झालेले couples  असतात ते म्हणतात न कि लग्नाआधी आमच्या relationship  मध्ये जो स्पार्क होता न तो नाही राहिला आता.. अरे कसा राहणार जर तुम्ही २४ तास एकमेकांच्या डोक्याला डोकी लावून बसलात तर .. जरा एकमेकां sapce  देऊन बघा न . प्रत्येकाला आपले आयुष्य असतेच..  आणि जर तुम्ही चांगले मित्र असाल तर फक्त त्याला मार्ग दाखवायला हवा बाकी त्याच्यावर सोपवायला हवे.. . जेव्हा  माणूस  स्वतः सुखी असतो न तेव्हाच तो relationship किंवा ग्रुप  मध्ये सुखी राहू शकतो....  

भूतकाळाच्या आठवणी

भूतकाळाच्या बोचऱ्या आठवणी
अंगावर शहरे आणतात

त्यातच  स्वप्नांची एक मंद झुळूक
मन भानावर आणते

मग भूतकाळातील आठवणी पुसट होत जातात
आणि नवीन आयुष्याच्या नवीन उमेदी डोके वर काढू लागतात

असेच सगळे सुरळीत चालू असते
पण वळवाच्या पावसाबरोबर परत आठवणी फेर धरू लागतात

आठवणींचा हा ऊन पावसाचा खेळ असाच चालू असतो
कधी बोचऱ्या तर कधी उबदार सारी हव्यहव्याश्या वाटतात

भूतकाळाच्या बोचऱ्या आठवणी
अंगावर शहरे आणतात 

काही सुचलं नाही म्हणून ...

आज निवांत वेळ होता  सोबतीला  माझी  आवडती डायरी होती पण लिहण्यासाठी काही टॉपिक सापडत नव्हता .. आज नवीन ऑफिस चा पहिला दिवस असल्याने  कामाचा विशेष लोड हि नव्हता ..  मागच्या आठवड्यातच मी माझ्या आधीच्या कंपनीचा निरोप घेतला..  कंपनी सोडताना मनावर एक विशिष्ट प्रकारचे  दडपण आले होते. येणारच न !!!. कारण त्या कंपनीमध्ये मी २.५ वर्ष होते. तिथे इतके चांगले फ्रेंड्स झाले होते.. ग्रुप्स झाले होते..  कि मी ती कंपनी सोडताना काय  कमवले असे मला विचारले तर मी ना कचरता म्हणेन कि मी माणसं कमावली  आणि तेच तर महत्वाचे असते . माणूस हा एक social animal आहे.  तो एकटा राहूच शकत नाही.. आणि आपल्या आयुष्यामध्ये मला तर वाटते कि माणसाचं महत्वाची असतात.. अशाप्रकारच्या विचारांनी माझे मन बेचैन होत होते.. कारण आता परत श्री गणेशाय नमः.. नवीन टीम कशी असेल? मी त्यांच्यात अड्जस्ट करू शकेल का? वगैरे वगैरे .. कामाच्या स्वरूपाचे काही वाटत नाही.. काम माणूस अड्जस्ट करून घेतो.. पण आजूबाजूचे लोक चांगले हवेत.. पण आज माझ्या असे लक्षात आले कि  इथे. चेहरे नवे होते.. qualities वेगळ्या होत्या.. कामाचे स्वरूप वेगळे होते पण माणसं तीच होती.. गरजा त्याच होत्या.. जगण्याची पद्धत वेगळी असली तरी भावना त्याच होत्या.. हे बघितल्यावर मला असे जाणवले कि अरे जगाच्या कुठल्याही ठिकाणी जाऊ तरी आपल्याला हेच बघायला मिळेल.. फक्त त्यांच्याबरोबर जुळवून घ्यायची कला आपल्याला अवगत हवी!!! 

दैव च म्हणायचं ...

मी माझ्या गावी गेले होते माझ्या चुलत भावाच्या लग्नासाठी.. तिथेच मला  माझ्या दूरची मामेबहीण दिसली.. जरा चिंतेतच दिसत होती.. कितीही नॉर्मल वागायचा प्रयत्न करत असली तरी कपाळावरच्या आठ्या काही लपवू शकली  नाही... पण मी नॉर्मलच बोलायला सुरवात केली.. सुरवातीला मोकळेपणे काही बोलली नाही .. पण हळूहळू  गप्पा रंगात आल्यावर तिने बोलायला सुरवात केली..तिच्या लग्नाला 5 वर्ष झाली पण मुलं बाळ  नाही म्हणून नवरा नाराज आहे.. तिची  सासू रोज त्याचे कान  भरते  कि तिला सोडून दे तिचा तसाही काही उपयोग नाही असे सतत नवऱ्याच्या  मनावर बिंबवत असते.. तिला हे बोलणे ऐकून खूप वाईट वाटते.. तिला मूल होत नाही यात तिची काय चूक?? वर्षांपूर्वी मोठ्या आजारातून जेमतेम बचावली.. पोटाची मोठी ऑपरेशन्स झालीत.. डॉक्टर तिला म्हणतात कि बाळासाठी इतक्यात प्रयत्न करू नका कारण तुमच्या आणि तुमच्या होणाऱ्या जीवाला पण धोका असू शकतो.. हे ऐकल्यावर कोणती स्त्री हे करायला  धजावेल? तिला हेच वाटत होते कि आपल्यामुळे त्या चिमुकल्याच्या जीवाला धोका कशाला??

                पण  हे समजून घेणार कोण? तिच्या सासरचे मात्र तिच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याऐवजी;तिचा मानसिक छळ करत आहेत.. आणि या गोष्टी तिला तिच्या भूतकाळातील त्या भयंकर आजाराची जाणीव करून देतात.. कळत नकळत का होईना सासूसासऱ्यांचा   जाच हे पण एक कारण होते तिच्या त्या भयंकर आजाराचे..सतत दडपणात  असायची ती.. देवाच्या कृपेने ती त्यातून सहीसलामत बाहेर आली खरी पण आता काय?? परत ती दपणाखाली जगणार?? परत ती त्या आजाराच्या तावडीत सापडणार?? देव जाणे.. एवढी सुशील आणि नम्र मुलगी.. तिच्या वाटेमध्ये आलेले बाभळीचे काटे काळीज सोलवटून टाकतात .. आणि यामध्ये मी काहीच करू शकत नाही याचे सल नेहमी बोचत राहील .. पण तिला धीर देण्याशिवाय मी काहीच करू शकत नाही..

कशासाठी आणि कोणासाठी ?

सूर्यास्ताची वेळ होती .. सूर्याच्या  लाल बुंद रुपावरुन नजर हटतच नव्हती .. पक्षांचे थवे च्या थवे आकाशात दिसत होते त्यांची  घरट्याकडे परतण्याची वेळ होती.. घरट्याकडे परतून आपल्या इवल्याश्या पिल्लाना भेटण्याचा आनंद त्यांच्या  किलबिलाटावरून स्पष्ट व्यक्त होत होता.. त्यांच्यामध्ये पण प्रेम जिव्हाळा असतोच ना .. ते मूक जीव का असेनात.. उलट मनुष्यच आता प्रॅक्टिकल विचार करत या गोष्टींपासून दूर होत चालला आहे.. परदेशात स्थायिक होणारे कित्येक लोक बघितले आहेत.. आधी भारत च महान असे म्हणणारे आता भारताकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत..
                हल्ली इंस्टाग्राम अँड फेसबुक वर ट्रेंड च झाला आहे.. पोस्ट टाकायची किंवा चेक इन करायचे .. ते बघून कूल वाटते.. कि wow !!! ती US मध्ये जाऊन MS  करतेय.. तो ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन MBA करतोय.. higher education घेणे काही वाईट नाही.. पण मग मी MS करून चार पाच वर्ष जॉब करून परत भारतात येणार असे विचार करणारे घराकडे परततच नाहीत.. कित्येक सूर्यास्त त्याचे घरचे वाट बघत बसतात.. पण त्यांचा  यायचा पत्ताच  नाही..मग त्याच्या आईवडिलांनी काय करावे ?.  त्या  बिचाऱ्या म्हाताऱ्या  आई वडिलांकडे  आठवणींशिवाय काहीच राहत नाही.. ज्यावेळी त्यांना त्याची सर्वात जास्त गरज असते त्याचवेळी  तो मुलगा पाठ फिरवून निघून जातो .. त्याला एकदा पण वाटत नसेल का कि ज्यांनी लहानपणापासून आपला सांभाळ केला त्यांच्याकडे परत यावे असे?
                 माणूस पैश्यांच्या आणि करिअर च्या इतका मागे लागतो कि तो जवळची माणसं असो कि रक्ताची नाती सगळेच  विसरून  जातो..  असे म्हणतात कि प्रॅक्टिकल माणूस च प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठू शकतो. पण हे माहितेय का? कि  तो हे कमावण्याच्या नादात इतका गुरफटून जातो कि त्याची आपली माणसं त्याच्यापासून दूर गेलेली देखील त्याला कळत नाहीत... आणि जेव्हा तो शिखरावर पोहचतो.. तेव्हा तो एकटाच असतो आणि त्याचा आनंदामध्ये सहभागी व्हायला पण कोणी बरोबर नसते..मग प्रश्न पड्तो कि त्याने हे कशासाठी केले आणि कोणासाठी??