अस्तित्व

सकाळीच फोन ची घंटी वाजली .. इतक्या सकाळी कोणी फोन केला या विचारातच फोन उचलला.. तिकडून आवाज आला.. ताई डिलिव्हरी झाली ..आमची कामवाली बाई होती.. तिच्या मुलीच्या डिलिव्हरी साठी सुट्टीवर गेलेली.. जरा त्रस्तच वाटत होती.. आवाजात आनंद नव्हता.. म्हणत होती ताई पोरीने खूप त्रास दिला.. रात्रभर जगवले..आता कुठे डिलिव्हरी झाली.. आणि हळू आवाजात म्हणली कि मुलगी झाली बघा.. काई करावे आता?? तिच्या आवाजातली शांतता बघून मन खायला उठले.. मुलीला मुलगी झाली म्हणून अजिबात खुश नव्हती ती....
आज तर मुली आणि मुलांमध्ये काही फरक राहिला नाही.. आणि हि परिस्थिती कामवालीकडे पण आहे.. ती तिच्या नवरायांपेक्षा जास्त कमावते .. पण तरीदेखील हिने असा विचार करावा हे अपेक्षित नव्हते. पण ती देखील काय करणार बिचारी तिच्या दुसऱ्या मुलीचा सासरी होणारा छळ बघून तिला वाटले असेल कि कशाला त्या नवीन जन्मलेल्या जीवाला त्रास !!! पुढे जाऊन तिच्या नशिबी हेच येणार नाही हे कशावरून ...
अशातच मला  दुसरी एक घटना आठवली .. माझ्या ऑफिस मधील मैत्रीण.. मुंबई उपनगरात राहणारी.. लोकल च्या दगदगीच्या आणि धावपळीच्या दुनियेत वावरणारी.. तिच्या शेजारी एक कुटुंब राहायचे.. त्या कुटुंबातील महिला शिकलेली आणि स्वतःच्या पायावर उभी असणारी.. रोज लोकल मधून प्रवास करणारी.. पण तिच्या नशिबी काही वेगळच होता.. तिला पहिल्या दोन्ही मुलीच म्हणून सासरच्यांकडून  आणि नवऱ्याकडून रोज टोमणे आणि छळ सहन करावे लागत असे.. असच असताना तिला परत दिवस गेले.. आणि घरच्यांच्या आग्रहाखातीर तिने गर्भलिंग तपासणी देखील  केली.. त्यामध्ये असे कळले कि तिला मुलगा होणार आहे.. त्यामुळे घरचे खूप खुशीत होते.. तिचे दिवस भरत आले होते.. एकदा अशीच ती ऑफिस मध्ये जाण्यासाठी लोकल मधून प्रवास करत होती.. आणि अचानक एकाच धक्का लागून ती चालत्या गाडीतून खाली पडली.. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा तिला जवळच्या हॉस्पिटल मध्ये भरती केले.. तिची हालत खूप बिकट होती.. अशातच डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि सांगितले कि आई किंवा बाळ यापैकी फक्त एकालाच आम्ही वाचवू शकतो.. आता या कुटुंबासमोर प्रश्न मोठा होता आई का बाळ (मुलगा) पण उत्तर अगदी सहज आणि सोप्पं होता.. आई .. पण एका क्षणाचाही विलंब न  लावता तिचा नवरा म्हणला कि बाळाला वाचवा.. आम्हाला वंशाला दिवा हवा आहे.. हिला वाचवून आम्ही काय करू.. डॉक्टर देखील २ मिनिटे स्तब्ध झाले.. हृदय थांबल्यासारखे वाटू लागले.. . पण अर्थातच कुटुंबाने सांगिलटल्यामुळे डॉक्टरांनी मुलाला वाचवले.. त्या मुलाला जन्मतःच पोरका केला.. वंशाला दिवा मिळावा म्हणून आई चा बळी  .. हे  स्वप्नात देखील कोणी विचार करेल असे वाटले नव्हते.  स्त्री म्हणजे काय machine  आहे का मुलांना जन्म द्यायची?? मग विचार येतो कि स्त्री खरच स्वतंत्र झालीय का?? वेशभूषा बदलली.. बाहेर कमला जाऊ लागली.. पैसे कमवू लागली..  पण खरंच तिला स्वतःच काही अस्तित्व आहे का ? का तिने नेहमीच दुसऱ्यांसाठी जगायचं?? 

महाश्वेता

मागच्याच आठवड्यात सुधा मूर्तींची 'महाश्वेता' कादंबरी वाचली. ज्यामध्ये श्वेतकुष्ठ झालेल्या मुलीची विवंचना सांगितली आहे.. नायिकेच्या सुंदरतेवर भाळून एक डॉक्टर तिच्याशी लग्न करतो आणि नंतर मग लग्नाच्या काही  दिवसातच तिच्या शरीरावर श्वेतकुष्ठाचे पांढरे डाग दिसायला लागतात.. आणि तिचा तोच नवरा जो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता ,तो आणि त्याच्या घरचे तिला वाळीत टाकतात आणि घरातून बाहेर काढतात.. किती दुर्दैव म्हणायचे तिचे !!!  हे वाचून तिच्या स्वार्थी नवऱ्याच्या बुद्धीवर कीव येते.
  जग किती स्वार्थी आणि उथळ आहे याची जाणीव होते.. . पण त्याच बरोबर महाश्वेता मधील नायिका कशी स्वतःच्या पायावर उभी राहते आणि समोर आलेल्या परिस्थितीला कशी तोंड देते हे बघून बळ देखील येते. .. माणूस सुंदरतेवर किती भाळतो !!! नुसते वरवर खोटे प्रेम करतो!!.. प्रत्येक मुलाला सुंदर मुलीशीच लग्न करायचे असते .. आणि नंतर मग जर दुर्दैवाने तिच्या सुंदरतेवर कधी बाधा आली तर मग तिला वाऱ्यावर  सोडायलाहि तो  मागेपुढे बघत नाही..   

.  जग हे असेच unfair  आणि उथळ असते असे वाटू लागते .. असेच मनात विचार चालू असताना .. मी माझ्या मित्राच्या लग्नाला दिल्ली ला गेले आणि तिथे एक जुना मित्र भेटला.. तेव्हा कळले कि त्याने इतक्यातच लव्ह marriage केले, ते पण डेटिंग अँप वरून..  त्याची बायको पण तिथे उपस्थित होती.. लग्न उरकल्यावर आम्ही त्या मित्राच्या घरी गेलो.. त्याच्या wife  ने पण चांगला पाहुणचार केला.. गप्पा गोष्टी चालू असताना माझी  नजर तिच्या पायांवर गेली.. आणि मग लक्षात आले कि तिच्या पायावर पांढरे डाग आहेत.. मला थोडा वेळ लागला ती गोष्ट पचवून घ्यायला.. माणूस कितीही सुशिक्षित किंवा मॉडर्न विचाराचा असला तरी अश्या गोष्टी पाहता क्षणी इग्नोर नाही करू शकत.. तेव्हा मला मी नुकत्याच वाचलेल्या महाश्वेता कादंबरीची आठवण  झाली.. त्या कथेतील नायिकेच्या नवऱ्यामध्ये  आणि माझ्या मित्रामध्ये किती फरक आहे !!! ह्याला लग्नाआधी माहित होते कि तिला हा प्रॉब्लेम आहे.. पण तरीही त्याने त्याचा विचार  न करता निस्वार्थी मानाने तिच्याशी लग्न केले.. मला त्याचे खरंच कौतुक वाटले..  समाजाचा विचार न करता याने तिला वाऱ्यावर न सोडता तिचा स्वीकार केला.. जगामध्ये अजूनसुद्धा माणुसकी आहे.. आणि लोकांचा या गोष्टीबद्दलच दृष्टिकोन बदलत आहे हे पाहून खूप चांगले वाटले..