सूर्यास्ताची वेळ होती .. सूर्याच्या लाल बुंद रुपावरुन नजर हटतच नव्हती .. पक्षांचे थवे च्या थवे आकाशात दिसत होते त्यांची घरट्याकडे परतण्याची वेळ होती.. घरट्याकडे परतून आपल्या इवल्याश्या पिल्लाना भेटण्याचा आनंद त्यांच्या किलबिलाटावरून स्पष्ट व्यक्त होत होता.. त्यांच्यामध्ये पण प्रेम जिव्हाळा असतोच ना .. ते मूक जीव का असेनात.. उलट मनुष्यच आता प्रॅक्टिकल विचार करत या गोष्टींपासून दूर होत चालला आहे.. परदेशात स्थायिक होणारे कित्येक लोक बघितले आहेत.. आधी भारत च महान असे म्हणणारे आता भारताकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत..
हल्ली इंस्टाग्राम अँड फेसबुक वर ट्रेंड च झाला आहे.. पोस्ट टाकायची किंवा चेक इन करायचे .. ते बघून कूल वाटते.. कि wow !!! ती US मध्ये जाऊन MS करतेय.. तो ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन MBA करतोय.. higher education घेणे काही वाईट नाही.. पण मग मी MS करून चार पाच वर्ष जॉब करून परत भारतात येणार असे विचार करणारे घराकडे परततच नाहीत.. कित्येक सूर्यास्त त्याचे घरचे वाट बघत बसतात.. पण त्यांचा यायचा पत्ताच नाही..मग त्याच्या आईवडिलांनी काय करावे ?. त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आई वडिलांकडे आठवणींशिवाय काहीच राहत नाही.. ज्यावेळी त्यांना त्याची सर्वात जास्त गरज असते त्याचवेळी तो मुलगा पाठ फिरवून निघून जातो .. त्याला एकदा पण वाटत नसेल का कि ज्यांनी लहानपणापासून आपला सांभाळ केला त्यांच्याकडे परत यावे असे?
माणूस पैश्यांच्या आणि करिअर च्या इतका मागे लागतो कि तो जवळची माणसं असो कि रक्ताची नाती सगळेच विसरून जातो.. असे म्हणतात कि प्रॅक्टिकल माणूस च प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठू शकतो. पण हे माहितेय का? कि तो हे कमावण्याच्या नादात इतका गुरफटून जातो कि त्याची आपली माणसं त्याच्यापासून दूर गेलेली देखील त्याला कळत नाहीत... आणि जेव्हा तो शिखरावर पोहचतो.. तेव्हा तो एकटाच असतो आणि त्याचा आनंदामध्ये सहभागी व्हायला पण कोणी बरोबर नसते..मग प्रश्न पड्तो कि त्याने हे कशासाठी केले आणि कोणासाठी??

Very practical and touching article!
ReplyDeleteमी येणार परत भारतात.
ReplyDelete