मागच्याच आठवड्यात सुधा मूर्तींची 'महाश्वेता' कादंबरी वाचली. ज्यामध्ये श्वेतकुष्ठ झालेल्या मुलीची विवंचना सांगितली आहे.. नायिकेच्या सुंदरतेवर भाळून एक डॉक्टर तिच्याशी लग्न करतो आणि नंतर मग लग्नाच्या काही दिवसातच तिच्या शरीरावर श्वेतकुष्ठाचे पांढरे डाग दिसायला लागतात.. आणि तिचा तोच नवरा जो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता ,तो आणि त्याच्या घरचे तिला वाळीत टाकतात आणि घरातून बाहेर काढतात.. किती दुर्दैव म्हणायचे तिचे !!! हे वाचून तिच्या स्वार्थी नवऱ्याच्या बुद्धीवर कीव येते.
जग किती स्वार्थी आणि उथळ आहे याची जाणीव होते.. . पण त्याच बरोबर महाश्वेता मधील नायिका कशी स्वतःच्या पायावर उभी राहते आणि समोर आलेल्या परिस्थितीला कशी तोंड देते हे बघून बळ देखील येते. .. माणूस सुंदरतेवर किती भाळतो !!! नुसते वरवर खोटे प्रेम करतो!!.. प्रत्येक मुलाला सुंदर मुलीशीच लग्न करायचे असते .. आणि नंतर मग जर दुर्दैवाने तिच्या सुंदरतेवर कधी बाधा आली तर मग तिला वाऱ्यावर सोडायलाहि तो मागेपुढे बघत नाही..
. जग हे असेच unfair आणि उथळ असते असे वाटू लागते .. असेच मनात विचार चालू असताना .. मी माझ्या मित्राच्या लग्नाला दिल्ली ला गेले आणि तिथे एक जुना मित्र भेटला.. तेव्हा कळले कि त्याने इतक्यातच लव्ह marriage केले, ते पण डेटिंग अँप वरून.. त्याची बायको पण तिथे उपस्थित होती.. लग्न उरकल्यावर आम्ही त्या मित्राच्या घरी गेलो.. त्याच्या wife ने पण चांगला पाहुणचार केला.. गप्पा गोष्टी चालू असताना माझी नजर तिच्या पायांवर गेली.. आणि मग लक्षात आले कि तिच्या पायावर पांढरे डाग आहेत.. मला थोडा वेळ लागला ती गोष्ट पचवून घ्यायला.. माणूस कितीही सुशिक्षित किंवा मॉडर्न विचाराचा असला तरी अश्या गोष्टी पाहता क्षणी इग्नोर नाही करू शकत.. तेव्हा मला मी नुकत्याच वाचलेल्या महाश्वेता कादंबरीची आठवण झाली.. त्या कथेतील नायिकेच्या नवऱ्यामध्ये आणि माझ्या मित्रामध्ये किती फरक आहे !!! ह्याला लग्नाआधी माहित होते कि तिला हा प्रॉब्लेम आहे.. पण तरीही त्याने त्याचा विचार न करता निस्वार्थी मानाने तिच्याशी लग्न केले.. मला त्याचे खरंच कौतुक वाटले.. समाजाचा विचार न करता याने तिला वाऱ्यावर न सोडता तिचा स्वीकार केला.. जगामध्ये अजूनसुद्धा माणुसकी आहे.. आणि लोकांचा या गोष्टीबद्दलच दृष्टिकोन बदलत आहे हे पाहून खूप चांगले वाटले..

मस्त. सत्यम शिवम सुंदरम हा सिनेमा पण थोडा असा च आहे.
ReplyDeleteआपण फक्त सुंदर मुलीवर उथळ प्रेम करतो असे मात्र नाही, तर आपण सगळ्या च गोष्टी उथळ पणे करतो, उदाहरणार्थ - चांगले काम असणारी कंपनी सोडून फक्त जास्ती पगार देणाऱ्या कंपनीत जाणे, केवळ मित्र महागडी बाईक घेतो म्हणून आपण ही बाबांकडे हट्ट करून तशी च बाईक घेणे, वगैरे
True!!!
ReplyDelete