मी कालच माझ्या मैत्रिणीला भेटले .. ती अलीकडेच हडपसर ला शिफ्ट झाली , आधी ती कोथरूड ला राहायची.. तिने तिचा कोथरूड चा अनुभव सांगितला.. ती सोसायटी मध्ये राहायला गेल्यावरच लगेच आजूबाजूच्यांनी चौकशी सुरु केली.. काय ग कुठली आहेस तू आणि तुझे आडनाव काय?? थोडक्यात काय तर जात कोणती हे जाणून घ्यायचे होते.. ती तर वैतागूनच गेली होती . हे सांगितल्यावर मला असे झाले कि .. जग कुठे चाललेय आणि हे कुठे ??
वर्तमानपत्रामध्ये हमखास बातमी दिसेल .. मुलीचे परजातीय मुलाबरोबर प्रेमप्रकरण घरी कळल्यामुळे मुलाला मारझोड.. मुलीची गळा कापून हत्या.. वगैरे वगैरे.. चित्रपटामधल्या अश्या गोष्टींना सर्वच लोक सपोर्ट करतात .. सगळ्यांना वाटते कि आंतरजातीय विवाह करणे काही गैर नाही पण ते दुसऱ्यांच्या घरात.. स्वतःच्या घरात कोणीही खपवून घेत नाही.. आईवडिलांना मुलींची काळजी असणे साहजिकच आहे.. पण जर मुलगा खरंच चांगला असेल आणि स्वतःच्या पायांवर उभा असेल तर जातीचे बंधन ठेवणे कितपत योग्य आहे??? आणि जर त्या मुलीने घरच्यांसाठी त्या मुलाला सोडले आणि घरच्यांच्या मनाप्रमाणे विवाह केला.. तर कशावरून तो दुसरा मुलगा चांगला असेल ?? कशावरून तो तिचा छळ करणार नाही ?? मी अश्या कित्येक केसेस ऐकल्यात आणि बघितल्यात... घरच्यांच्या जबरदस्तीमुळे लग्न केले आणि आता डिवोर्स साठी कोर्टाच्या फेऱ्या मारून मारून चप्पल झिजवत आहेत.. एवढी उठाठेव सांगितली कुणी??
मी लग्नाआधी एका सोसायटी मध्ये राहायचे.. तिथे एक काकू राहायच्या त्यांना दोन मुलं होती.. दोन्ही हि लग्नाळू .. वय वाढत होती.. आणि त्यांची लग्न ठरता ठरेनात.. त्यांनी त्यांच्या जेष्ठ चिरंजीवास विचारले कि तू प्रेम विवाह का करत नाहीस?? एखादी मुलगी बघ... कशीही असूदेत पण आपल्या जातीमधली हवी ... हे कळाल्यावर हसूच आले.. जात बघून कोण प्रेम करते का?? आणि मग असेच वय वाढत जाते.. हल्ली मुली मिळणे पण अवघड झालेय.. आणि काय तर जातीमधलीच पाहिजे म्हणून ३०-३२ वर्षापर्यंत थांबायचे.. आणि नंतर वय वाढत चाललेय आणि मुली मिळत नाहीत म्हणून आंतरजातीय विवाह करायचा.. हे गणित कळायला च अवघड वाटते.. हे च जर आधीच केले असते तर हि वेळ आलीच नसती..
पहिल्या काळी प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूप वेगळे होते.. आणि त्यानुसार जातीपद्धत रुजू झाली.... पण हल्ली प्रत्येक जातीमधील लोक उच्च शिक्षण घेत आहेत. .. आपल्या आवडीनुसार प्रत्येकजण काम करत आहेत.... जर प्रत्येक जण आपला पारंपरिक व्यापार सोडून नवीन गोष्ट शिकत आहेत तर मग जातीपद्धत मानायची गरजच नाहीये.. पण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण.?? बाहेरच कोणी सांगायला गेले तर म्हणतात तुमच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तर चालेल का?? जर समाजाला जातीच्या चौकडीतून बाहेर काढायचे असेल तर स्वतःच्या घरापासूनच सुरवात करायला हवी..

खूप चांगला विषय निवडलास लिहायला... पण 'लोग क्या कहेंगे' यामुळे चौकडीतून कोण बाहेरच येत नाहीय..!!
ReplyDelete